वेबसाईट कशी असावी?

   वेबसाईट कशी असावी?

वेबसाईट हि रेस्पॉन्सिव्ह असावी. ती कोणत्याही डिव्हाईसला ऑटोमाटिक अड्जस्ट करणारी असावी मग व्हिजिटरचा मोबाईलच अँड्रॉइडच व्हर्जन कितीही जुने असूदेत आपल्या वेबसाईटने त्याला ऑटो अड्जस्ट केले पाहिजे. 

दुसरा मुद्दा म्हणजे वेबसाईट लिहिला जाणारा कन्टेन्ट म्हणजे माहिती हि आपण स्वतः लिहिली आहे कि कोनाकडून लिहून घेतली आहे ह्याने कोणताही फरक पडत नाही फरक पडतो तो आपण जो कन्टेन्ट वेबसाईट पोस्ट करतोय तो कोणत्या दुसऱ्या वेबसाईटवरून कॉपी तर केला नाहीये ना मग काही हरकत नाही कारण हा सर्वात महत्वाचा पॉईंट ठरतो (S E O ) सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करतानाचा म्हणजे सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गूगल सारख्या सर्च इंजिन मध्ये आपली वेबसाईट रँकिंग ला आणताना वर्क होणारा सर्वात मोठा फॅक्टर.

what should a website look like | website development company in pune | web development services | web development agency

वेबसाईट हि कन्व्हर्जन करून देणारी असावी म्हणजे वेबसाईटवर येणाऱ्या व्हिजिटरचे तिने लीड मध्ये कन्व्हर्जन करून दिले पाहिजे. आणि वेबसाईटच्या ओनर पर्यंत लवकरात लवकर कनेक्ट करून दिले पाहिजे जर तिने ऑटो रिप्लाय करून व्हिजिटरच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून दिली तर फारच उत्तम. म्हणजे इथे वेबसाईटच्या ओनरचा चक्क वेळ वाचतो आहे आणि समजा कोणी लाईव्ह चाट इम्पलिमेन्ट केलं असेल आणि कोणाला हायर केलं असेल  कस्टमर ला सपोर्ट प्रोव्हाईड करण्यासाठी तर त्याची सॅलरीही वाचतेय मोठ्या कंपनीमध्ये जनरली सपोर्टला एम्प्लॉयी हायर केले जातात पण ह्या नुसार आपल्या स्वतःचा वेळ तर वाचेल हे नक्की.

WhatsApp Image 2020-07-03 at 3.03.16 PM

ह्यामध्ये त्यांना वेबसाईटशी प्रश्न उत्तरे च्या माध्यमातून कॉन्टॅक्ट साधता येईल आणि त्यांच्या प्रश्नाचे समाधान ही तिथेच भेटेल आपण तिथेच त्यांच्याकडून आपल्या सर्विसेस चा अभिप्राय नाहीतर व्हाट्स अँप किंवा फेसबुक ला पाठवू शकतो आपले नवीन पेजेस तिथे दाखवू शकतो त्यांची रिक्वायरमेन्ट विचारू शकतो काही फारच गंभीर विषय असेल तर एखाद्या कन्सर्न पर्सनला कनेक्ट करून देऊ शकतो.

आपल्या वेबसाईटवर आलेल्या व्हिसिटरवर लक्ष्य ठेवू शकतो म्हणजे व्हिसिटर आपल्या वेबसाईट होम पेजवर किती वेळ घालवताहेत मग ते होम पेज वरून बाकीच्या पेजेसवर जाताहेत का? 

जर का ह्याच उत्तर नाही असेल तर आपली वेबसाईट नाहीतर वेबसाईटवरचा कन्टेन्ट त्यांना आवडलेला नसावा असं ही असू शकत मग ते आपल्याला ठरवण्यासाठी काही रिपोर्ट पाहिजे वेबसाईटवर किती व्हिसिटर आले आहेत ह्या आठड्यात किंवा महिन्यात त्यांनी आल्यानंतर वेबसाईटवर काय केलं म्हणजे कोणता फॉर्म भरला का सर्विसेसच पेजला व्हिजिट केली कोणत्या पेज जास्त टाईम स्पेंड केला आणि किती? आणि कोणत्या पेजवरून ते फॉर्म न भरताच निघून गेले?

एक चांगली आणि प्रभावी वेबसाईट आपल्या वेबसाईटवर आलेल्या प्रत्येक प्व्हिसिटरला काउन्ट करत असते म्हणजे आपला व्हिसिटर जेव्हा फेसबुक वापरत असेल तेव्हा वेबसाईट ने रेकॉर्ड केलेला डेटा वापरून आपण त्यांना फेसबुकवर पण आपली ऍड त्यांना दाखवू शकतो किंवा एखादी स्पेशल ऑफर फक्त वेबसाईटवर व्हिसिटर साठी फक्त लॉन्च करू शकतो कारण ते इंटरेस्टेड आहेत आणि एखादी ऑफर दिसली तर प्रॉडक्ट घेतील सुद्धा. आपण काही वेळेस हा अनुभव घेतला असेल कि समजा आपण अमेझॉनवर एखादा शूज पहिला पण घेतला नाही तसेच आपण कोणतेही रेजिस्ट्रेशन न करता निघून आलो पण आपण जेव्हा त्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम, गूगलवर जातो तेव्हा आपल्याला आपण पाहिलेला तो शूजच का बर सारखा सारखा दिसत असेल कारण एकच त्यांनी त्यांच्याकडे वेबसाईट थ्रू  आलेल्या डेटाचा आणि उपलब्ध असलेल्या माध्यमांचा (सोशल मीडिया ) त्यांनी पुरेपूर वापर केला आहे हे मात्र नक्की.

what should a website look like | website development company in pune | web development services | web development agency

मग तुम्हीपण ह्या सर्व गोष्टी प्रभावीपणे करताय ना काय हो म्हणताय मग फारच उत्तम 

आणि जर नसाल करत आजच आपली एक प्रभावी वेबसाईट नक्की बनवून घ्या आणि जर वेबसाईट असेल तर चेंजेस करून घ्या. आपल्याला हा लेख आवडला असेल तर तुम्हाला वाटत असेल कि कोणी त्यांची वेबसाईट चांगली बनवली पाहिजे त्यांच्या पर्यंत हा लेख शेअर करून पोहचवा 

धन्यवाद 

प्रतिक सकपाळ

टीम डिजिटल टेक्नॉलॉजी सेंटर