व्हायरल मार्केटिंग म्हणजे काय?

मित्रानो व्हायरल मार्केटिंग म्हणजे जी मार्केटिंग एखाद्या व्हायरस सारखी पसरते. ती एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून अनेक जणांकडे अत्यंत वेगाने पसरते त्यास व्हायरल मार्केटिंग असे म्हणतात.फरक फक्त एवढाच असतो व्हायरस सर्वांसाठी त्रासदायक असतो आणि व्हायरल मार्केटिंग द्वारे आपण आपला व्यवसाय,कामाची गुणवत्ता,आपल्या उत्पादनाचे फायदे इत्यादी अनेक गोष्टी व्हायरल करू शकतो.आता सद्याच्या काळात आपण ह्या गोष्टीचा प्रत्यय आपण सर्व जण घेत आहोत.

आता सध्याच्या सोशिअल मीडियाच्या काळात व्हायरल मार्केटिंग म्हणावे तर सोपे तसेच टेकनिकल झाले आहे. आपण थोडीशी योजना करून आपला व्यवसायाचा ब्रँड मध्ये रूपांतर करू शकतो किंवा ब्रँडचे मार्केटिंग करून आपल्या टार्गेटेड ऑडियन्सचे माईंड स्टोमिन्ग करू शकतो. आपण सकाळी उठल्यापासून कोणत्या ना कोणत्या ब्रँडची जाहिरात पाहत असतो. सर्व मोठे मोठे ब्रँड हेच करून मोठे किंवा प्रसिद्ध झाले आहेत.


माध्यम आणि उपयोग्यता –

व्हाट्स अँप मार्केटिंग –

statista.com च्या २९ मे २०२० च्या रिपोर्ट नुसार भारतामध्ये २०० दशलक्ष महिनाभगरात फेब्रुवारी २०१७ मध्ये वापरले आहे. म्हणजे आपल्या सर्वांचे ग्राहक व्हाट्स अँप वापरत आहेत तर त्याचा उपयोग करून आपण व्हाट्स अँप वर आपण व्हायरल मार्केटिंग करू शकतो.

हेही वाचा – वेबसाईट कशी असावी?

फेसबुक 

फेसबुकचे २०२० मध्ये ३४६,२ दशलक्ष वापरकर्ते आहेत आणि हि आकडेवारी २०२१ मध्ये ३७८.९ दशलक्ष तसेच २०२३ मध्ये हि आकडेवारी अंदाजे ४४४.२ दशलक्ष होईल असा अंदाज फेसबुकने वर्तवलं आहे असं statista.com यांचं म्हणणं आहे. तसेच आपण फेसबुकवर ऑरगॅनिक तसेच पेड प्रमोशन आपण करू शकतो. पेड असेल तर आपल्याला जरा लवकर रिझल्ट भेटेल व ऑरगॅनिक असेल तर रिझल्ट भेटण्यासाठी काही वेळेस थोडा वेळ सुद्धा लागू शकतो.

इंस्टाग्राम

भारतामध्ये इंस्टाग्राम वापरकर्त्यांची संख्या एप्रिल २०२० पर्यंत ८८ दशलक्ष आहे तसेच भारत हा इंस्टाग्राम वापरणाऱ्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच इंस्टाग्राम हा प्लॅटफॉर्म मेनली फोटो व व्हिडीओसाठी बनवण्यात आला आहे.

युट्यूब

युट्युब हेही सध्या व्हायरल मार्केटिंगसाठी योग्य माध्यम आहे. एप्रिल २०२० पर्यंत सर्वात जास्त views सोनी एंटरटेनमेंट ला भेटले आहेत. एप्रिल २०२० पर्यंत सोनी एंटरटेनमेंट ला ४५ अब्ज views भेटले आहेत.

जर आपण B2B मध्ये वर्क करत असाल तर आपल्यासाठी LinkedIn हा सुद्धा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरू शकतो.
एवढे युझर ह्या प्रत्येक प्लेटफॉर्म वर आहेत आपण त्यातल्या आपापल्या टार्गेटेड ऑडियन्सला टार्गेट करून आपण आपला बिझनेस वाढवू शकतो.

धन्यवाद
प्रतिक सकपाळ
टीम डिजिटल टेकनॉलॉजी सेंटर
टेक्नॉलॉजी वापरूया व्यवसाय वाढवूया

हेही वाचा – वेबसाईट कशी असावी?